ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण नगरपरिषदे तर्फे शीलाफलक अनावरण व स्वातंत्र्य सैनिक तथा वीरांना वंदन ; आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमा अंतर्गत उपक्रम.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवण नगरपरिषदे तर्फे शीलाफलक अनावरण व स्वातंत्र्य सैनिक तथा वीरांना वंदन ; आजादी का अमृत महोत्सव समारोप कार्यक्रमा अंतर्गत उपक्रम.

प्रकाशन: 14 Aug 2023 09:32 PM
वाचन संख्या 234

मुख्याधिकारी व प्रशासक श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणारी ‘माझी माती , माझा देश’ मोहीम.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमात ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेअंतर्गत ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक), वीरोंको वदन, हर घर तिरंगा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मालवण नगरपरिषद तर्फे ‘माझी माती माझा देश’ या मोहिमेत सहभागी होऊन मुख्याधिकारी व प्रशासक श्री. संतोष जिरगे, सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ९ ऑगस्टला नगरपरिषद आवारातील उद्याना मध्ये मातीचा दिवा घेऊन प्रंचप्रण शपथ घेतली. या कार्यक्रमात शहरातील सर्व शाळा व महाविदयालये, शासकीय कार्यालये यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मातीचा दिवा घेऊन प्रंचप्रण शपथ घेतली. त्याचप्रमाणे वसुधा वंदन कार्यकमा अंतर्गत ११ ऑगस्टला, देशी प्रजातीची रोपे वन विभागाकडून प्राप्त करुन मालवण रॉक गार्डन येथे ७५ रोपट्यांची लागवड करुन ‘अमृतवाटीका’ तयार करण्यात आली.

शासनाच्या सूचनेनुसार, १४ ऑगस्टला शिलाफलक तयार करणेत आली. शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन बाबतचा कार्यक्रम सकाळी ११ वाजता मालवण नगरपरिषद आवारात आयोजित करण्यात आलेला होता. शिलाफलकाचे अनावरण करीता मालवण शहरातील स्वातंत्र्य सैनिक यांच्या कुटुंबातील सदस्य यांना निमंत्रीत करण्यात आले. त्यानुसार १) माजी स्वातंत्र्य सैनिक रामराव भाऊ पांगे यांची मुलगी श्रीमती संगिता रामराव पांगे, २) माजी स्वातंत्र्य सैनिक रामचंद्र कृष्णाजी पराडकर यांचा नातू श्री. अतुल कीर्तीकुमार पराडकर , ३) माजी स्वातंत्र्य सैनिक सहदेव सिताराम खराडे यांचा मुलगा श्री. महादेव सहदेव खराडे, ४). माजी स्वातंत्र्य सैनिक गणपत तुकाराम तपकीरकर यांचा मुलगा श्री आनंद गणपत तपकीरकर, ५). माजी स्वातंत्र्य सैनिक वामन विष्णू कवटकर यांचा मुलगा दशरथ वामन कवटकर,६) माजी स्वातंत्र्य सैनिक महादेव भिकाजी बांदेकर यांचा नातू श्री. अजित दत्तात्रय बांदेकर यांच्या हस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यांनतर कार्यक्रमाच्या ठिकाणी राष्ट्रगीत गायन करण्यात आले. स्वातंत्र्य सैनिक व वीरांना वंदन कार्यक्रमा अंतर्गत माजी लोकप्रतिधींनाही निमंत्रीत करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला माजी लोकप्रतिधी दीपक पाटकर, मंदार केणी, पूजा सरकारे, श्रीमती निना मुंबरकर, श्रीमती जयमाला मयेकर, जॉन न-होना, विलास मुणगेकर, दर्शना कासवकर उपस्थित होते. तसेच काही सेवानिवृत्त कर्मचारीही उपस्थित होते. उपस्थित लोकप्रतिनिधींच्या हस्ते माजी स्वातंत्र्य सैनिक यांची कुटुंबातील सदस्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्य अधिकारी श्री. संतोष जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम व कार्यक्रम संपन्न झाला.

मालवण नगरपरिषद इमारत.

फोटो सौजन्य : मालवण नगरपरिषद प्रशासन

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स