चिपीयेक उतारला इमान..; विमानाचे चाचणी लॅन्डिंग यशस्वी...!
जिल्हावासियांतील विमानोत्सवाच्या उत्कंठावाढीला यशस्वी लॅन्डिंग चाचणीने दाखवली आगामी विमानकाळाची चुणूक..!
ब्यूरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग चिपी विमानतळाच्या शनिवारी दि. ९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी घेण्यात आलेल्या विमानाची लँडिंग चाचणी यशस्वी झाली आहे.
बहुचर्चीत सिंधुदुर्ग विमानतळ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. विमानतळाचे उद्घाटन होत आहे या पार्श्वभूमीवर एमआयडीसी आय आर बी आणि विमान कंपनीचे नियोजन सुरु केले आहे. विमानतळाच्या उद्घाटनाच्या दोन दिवस आधी गोवा ते सिंधुदुर्ग असा लायन्स एरलाइन्स विमानाचा प्रवास करीत टेस्ट लँडिंग करण्यात आले. यावेळी पायलट सोबत तंत्रज्ञ कर्मचारी होते. दरम्यान विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात आले त्यानंतर एका तासाने लायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरुन टेक ऑफ करत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. ह्या चाचणी वेळी पोलिस बंदोबस्त चोख व कडेकोट ठेवण्यात आला होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)