ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक गाबीत समाजाबाबतीत आक्रमक.  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली मागणी

आमदार वैभव नाईक गाबीत समाजाबाबतीत आक्रमक. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली मागणी

प्रकाशन: 02 Aug 2023 10:41 PM
वाचन संख्या 38

मालवण | सुयोग पंडित :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात राहणाऱ्या गाबीत समाजाच्या नागरिकांना जात पडताळणी करताना महसुली पूराव्याची येणारी अडचण दूर करण्यासाठी आज कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे चर्चा करताना गाबीत समाजाला जात पडताळणीसाठी महसुली पूराव्याची अट शिथिल करावी व महसुली पथकाने स्थळ पाहणी करून, गृह चौकशी करून गाबीत समाजाची जात पडताळणी प्रकरणे निकाली काढावीत अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात मच्छिमार असलेल्या गाबीत समाजाच्या नागरिकांचे वास्तव्य आहे.मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह ते करतात. गाबीत समाजातील लोकाना पूर्वीचे जमीन मालक हे कबुली जबाबावरून किनारपट्टी भागातच झोपड्या बांधून राहण्यास देत होते. मच्छिमारी करणे सोयीचे असल्याने किनारपट्टी भागातच गेले अनेक वर्षे ते राहत आहेत. गाबीत समाजाला शासनाने विशेष मागास प्रवर्ग म्हणून घोषित केले आहे. मात्र त्यांच्या राहत्या जमिनी मालकी हक्काच्या नसल्याने मुलांच्या शिक्षणासाठी व इतर कारणासाठी जात पडताळणी करताना त्यांना महसुली पूरावा जोडता येत नाही. त्यामुळे कायदेशीररित्या विशेष मागास प्रवर्ग किंवा केंद्र शासनाच्या मागासवर्गीय जातीसाठी असलेल्या आरक्षणीय सवलतींपासून वंचित रहावे लागत आहे.त्यामुळे गाबीत समाजाच्या नागरिकांना जात पडताळणीसाठी महसुली पूराव्याची अट शिथिल करावी. व महसुली पथकाने स्थळ पाहणी करून, गृह चौकशी करून गाबीत समाजाची जात पडताळणी प्रकरणे निकाली काढावीत अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी पावसाळी अधिवेशनात केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स