ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सर्जेकोट मिर्याबांदा येथील ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सर्जेकोट मिर्याबांदा येथील ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे मानले आभार

प्रकाशन: 01 Aug 2023 04:21 PM
वाचन संख्या 76

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या सर्जेकोट पिरावाडी येथे किनारपट्टीवर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्त्याचे काम करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरून हे काम करण्याचे वचन आ. वैभव नाईक यांनी दिले होते.त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत वचनपूर्ती केली त्याबद्दल सर्जेकोट मिर्याबांदा येथील ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.आज अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत असताना आमदार वैभव नाईक यांनी सर्जेकोट पिरावाडी येथे धूप बंधाऱ्याच्या झालेल्या कामाची पाहणी केली. याठिकाणी स्लोपींगचे काम सुरु असून स्लोपींगची लांबी ८ ते १० मीटरने वाढवून मिळावी अशी निवेदनाद्वारे मागणी ग्रामस्थांनी केली.

याप्रसंगी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, सर्जेकोट ग्रा. प. सदस्या भारती आडकर, रघुनंदन(मामा) खडपकर, शाखा प्रमुख विनायक कोळंबकर, केशव सावजी, संजय जामसंडेकर, नरेंद्र जामसंडेकर, हरी खवणेकर, चेतन खडपकर,प्रशांत जामसंडेकर, दीपक जामसंडेकर, योगेश कांदळगावकर, अक्षय जामसंडेकर, नाना आडकर, धनंजय जामसंडेकर, संतोष जामसंडेकर, विनायक आरोलकर, गुरुनाथ खवणेकर, वैभव कांदळगावकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स