ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी पाठवली जाणार सिंधुदुर्गवासियांकडून  5000 पत्रे.....!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधण्यासाठी पाठवली जाणार सिंधुदुर्गवासियांकडून 5000 पत्रे.....!

प्रकाशन: 06 Oct 2021 12:37 PM
वाचन संख्या 210

वायडब्ल्यूएचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांचे थेट गडकरींना पत्र

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांच्या अवस्थेचा परिणाम येथील विकास आणि उद्योग व्यवसायावर होत आहे. याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लक्ष वेधण्यासाठी त्यांना जिल्ह्यातील नागरिकांकडून 5000 हजार पत्रे पाठविली जाणार असल्याची माहिती वायडब्ल्यूए अर्थात युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी गडकरी यांना पत्र लिहिले आहे.

या पत्रात तेजस घाडीगांवकर यांनी म्हटले आहे की, नितीनजी गडकरी साहेब, युथ वेल्फेअर असोसिएशन, ही एक सामाजिक संस्था असून युवकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व रोजगार विषयक समस्यांवर कार्यरत आहे. आमच्या संस्थेमार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार स्वयंरोजगार तसेच येथील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी गावपातळीवर समित्यांची स्थापणा करुन शासकिय यंत्रना आणि तळागाळातील सर्वसामान्य व्यक्ती यांमधील दरी कमी करून ग्रामपातळीवरील सर्वांगीक विकासाला हातभार लावण्याचे काम अग्रेसर पणे सुरू आहे.
सदर उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, या जिल्ह्यात समृद्ध निसर्ग, दर्जेदार पर्यटन स्थळे, उद्योगासाठी पोषक परीस्थिती व स्वयंरोजगारासाठी मोठी संधी याठिकाणी उपलब्ध होऊ शकते. सध्या या जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गाच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे, परंतु सिंधुदुर्गच्या अंतर्गत भागातील परिस्थिती पाहता या महामार्गाला जोडणा-या जिल्ह्यातल्या अंतर्गत रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. एकंदरीत सिंधुदुर्गचा व्यवसायिक व पर्यटनदृष्ट्या विकास घडवायचा असल्यास अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व विकास करणे अत्यावश्यक आहे.
विषेश म्हणजे या अवस्थेकडे जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी व कोणतेही मंत्री महोदय लक्ष देत नाहीत, त्यामुळे होणारे व्यावसायिक नुकसाणाबाबत योग्य तो विचार करीत नाहीत. म्हणून युथ वेल्फेअर असोसिएशन वतीने अंतर्गत रस्ते सुधारणा व त्यांच्या विकासाकरता आपल्याला ग्रामस्थांच्या मार्फत 5000 विनवणी पत्रे आपणास पाठवून सदर विषयांबाबत आपले लक्ष वेधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण सिंधुदुर्गातील ग्रामस्थांच्या विनंतीला दाद देऊन जिल्ह्याच्या आंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घ्यावा, हीच आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स