ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वायरमन बांधवांनी वीजपुरवठा केला सुरळीत ; ठाकरे गट शिवसेना ग्रा पं सदस्य वंदेश ढोलम व युवासैनिक यांचा पुढाकार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वायरमन बांधवांनी वीजपुरवठा केला सुरळीत ; ठाकरे गट शिवसेना ग्रा पं सदस्य वंदेश ढोलम व युवासैनिक यांचा पुढाकार.

प्रकाशन: 21 Jul 2023 09:25 PM
वाचन संख्या 391

कट्टा येथे वीज व पाण्याची गंभीर समस्या टळली.

मालवण | सुयोग पंडित : मालवण तालुक्यातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक व युवासैनिकांनी प्रसंगावधान राखत आज भर पावसाच्या स्थितीत कट्टा येथील ग्रामस्थांच्या मोठ्या समस्येचे निवारण केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या नांदोस येथे विद्युत वाहिनीवर झाडाची फांदी कोसळल्याने कट्टा गोकुळआळी परिसरात व बाजारपेठेतील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळे त्या वाहिनीवरून कट्टा गोकुळआळी व बाजारपेठ परिसरात आज पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता आणि उद्या पण झाला नसता तर पाण्याची समस्या निर्माण झाली असती व याचा ग्रामस्थांना मनःस्ताप सहन करावा लागला असता. त्यानंतर वायरमन बांधवांशी संपर्क केल्यावर त्यांनी समस्या सांगितली व मदत करण्याचे आवाहन केले. त्याची दखल घेऊन ग्रामपंचायत सदस्य वंदेश ढोलम , समीर माळवदे म, निखिल बांदेकर, किरण वाईरकर, उपेंद्र बोडये, सिद्धार्थ हिरवे, दर्शन म्हाडगुत यांनी जागी जाऊन फांदी बाजूला करण्यास मदत केली. या कार्यवाहीत वायरमन गणेश वारंग, व वायंगणकर यांनी युद्धपातळीवर रात्री ८ वाजेपर्यंत अतिशय खडतर भाग व परिस्थितीत काळोखात काम केले. या बद्दल सर्वांचे आभार मानले जात आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स