ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस युवक सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील विशाल जाधव यांची निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस युवक सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील विशाल जाधव यांची निवड.

प्रकाशन: 16 Jul 2023 10:42 AM
वाचन संख्या 67

वैभववाडी ब्यूरो : शरद पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी वैभववाडी येथील फुले, शाहू आंबेडकरी चळवळीचे तरुण युवा कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले विशाल बाबल्या जाधव यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली असून, त्याच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सद्या होत असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नवीन युवा कार्यकर्त्याने सोबत घेऊन जोमाने पुढे जाणार असून पक्षाचे प्रतोद व विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड हे नुकतेच सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने व राष्ट्रवादी युवक काँग्रे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या लेखी आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवक अध्यक्ष पदी विशाल बाबल्या जाधव यांच्या निवडीचे लेखी पत्र नुकतेच जितेंद्र आव्हाड यांच्या शुभहस्ते यावेळी देण्यात आले. विशाल जाधव हे वैभववाडी या तालुक्यातील कोळपे या गावचे सुपुत्र असून विविध सामाजिक संघटनेत ते कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यात युवकांचे संघटन निर्माण करून पक्ष वाढीसाठी आपण प्रामाणिक काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविणार असल्याचे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन जिल्हा युवा अध्यक्ष विशाल जाधव यांनी यावेळी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स