निमजगा शाळा इमारत धोकादायक झाल्याने शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांनी वेधले लक्ष
बांदा /राकेश परब : बांदख निमजगा येथील जिल्हा परिषदेची शाळा इमारत मोडकळीस आली असून, कोसळण्याच्या स्थितीत असल्याने त्या जीर्ण इमारतीमुळे मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याने शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्याक उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व पालकांनी शाळेतभेट देत प्रशासनाला धारेवर धरले. बरेच दिवस झाले तरी शाळेच्या इमारतीचे निर्लेखन झाले नाही. येत्या आठ दिवसांत काम सुरू होणार असल्याचे आश्वासन विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर व केंद्रप्रमुख संदीप गवस यांनी दिले.
सदरची ही निमजगा पूर्ण प्राथमिक शाळेत एकूण ४० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या समोरील भागाच्या इमारतीचे छप्पर व इमारत जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी कौलै व छप्पर कोसळले आहे. शाळेच्या मुलांच्या जेवणाच्या सुट्टी मध्ये मुले या ठिकाणी खेळत असल्याने इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न खान यांनी उपस्थित केला. तातडीने शाळेचे काम न केल्यास शाळा बंद करावी लागेल असा इशारा रियाज खान यांनी दिला. आतापर्यंत जीर्ण इमारतीच्या निर्लेखनसाठी पाच वेळा शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत ठराव घेण्यात आला. प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला असून येत्या आठ दिवसांत काम सुरू होणार आहे. यासाठी पालक व स्थानिकांनी सहकार्य करावे. अशी माहीती विस्तार अधिकारी दुर्वा साळगावकर यांनी दिली.
या शाळेची इमारत धोकादायक बनली असून याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होणार असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले काही शाळेचे छप्पर कोळसले आहे तशीच घटना न होता . मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर कार्यवाही करा असे रियाज खान, तालुका उपाध्यक्ष, अल्पसंख्यांक सेल, शिवसेना – यांनी सांगितले
शेवटी काम लवकर न सुरू झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी मंथन गवस, संजय आईर, अमोल धुरी, रामदास सावंत, राजा खान, धर्मा राठोड,बाबुराव शेटकर, मोहसीन खान, उमेश शेटकर, सुभाष नाईक, संदेश उरुमकर, मुख्याध्यापक प्राजक्ता राऊळ आदी उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)