ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचा ठाण्यामधून शुभारंभ : नरेश म्हस्के.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मुख्यमंत्र्यांच्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याचा ठाण्यामधून शुभारंभ : नरेश म्हस्के.

प्रकाशन: 12 Jul 2023 04:54 PM
वाचन संख्या 200

मुंबई | ब्युरो न्यूज : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांचे मेळावे आगामी काळात होणार आहेत. या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात ठाण्यातून होणार असून, यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांना मार्गदर्शन करणार आहेत. हा मेळावा गुरुवारी १३ जुलैला सायंकाळी ६ वाजता ‘टिप-टॉप प्लाझा, तीन हात नाका, ठाणे’ येथे संपन्न होणार आहे अशी माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून शिवसेना मुख्यनेते . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्या टप्प्यात पुणे, कोल्हापूर, नवी मुंबई येथे मेळावे घेणार आहेत.

या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याची सुरुवात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून होणार आहे, गुरुवार दि.13/07/public/uploads/2023 रोजी टिप-टॉप प्लाझा येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी ठाण्यातील सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि समस्त शिवसैनिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख, प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स