ताज्या बातम्या
कांदळगावात आमदार निलेश राणे यांच्या विकासकामांच्या झंझावाताने प्रेरित होत अनेकांचा शिवसेना पक्षप्रवेश. पाझर तलाव वाचविण्यासाठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठिंबा. परमपूज्य सद्गुरू सदानंद माऊली महाराज यांचा १ नोव्हेंबर रोजी १४ वा पुण्यस्मरण दिन सोहळा. केरळच्या मुलींची महाराष्ट्रावर मात तर तेलंगणाचा उत्तर प्रदेशवर अतिरिक्त वेळेत निसटता विजय. पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...!
शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे - कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई प्रतिष्ठानच्यावतीने बांदिवडे - कोईळ शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप!

प्रकाशन: 04 Jul 2023 08:42 PM
वाचन संख्या 286

मसुरे | प्रतिनिधी : शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज ओळखून शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई या प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोईळ या ग्रामीण भागातील शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,वह्या, पेन, पेन्सिल,पाउच इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

“शैक्षणिक मदतीचा लाभ घेत शालेय विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी व गावचे नाव उंचावत ठेवावे,” असे आवाहन शिवप्रतिष्ठांच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती कोईळ अध्यक्ष श्री .निलेश साटम, आशा सेविका उर्मिला आठवले, हर्षदा साटम, श्रद्धा साटम, श्रुतिका साटम, सृष्टी कदम, शर्मिला साटम, शिक्षिका वर्षाराणी सुरवसे, मुख्याध्यापक श्री. गणेश सुरवसे उपस्थित होते. “शिवप्रतिष्ठान फणसे मुंबई या संघटनेच्या सदस्यांची ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रती असलेली दानशूर वृत्ती खरोखरच कौतुकास्पद आहे,” असे उद्गार यावेळी बोलताना सौ. वर्षाराणी सुरवसे यांनी काढले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स