ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पळसंब गांवात बी एस एन एल (BSNL) च्या दूरसंचार सेवेचा बोजावरा ; माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व विद्यमान उपसरपंच अविराज परब यांनी आक्रमक मागणी करत दिला उपोषणाचा इशारा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पळसंब गांवात बी एस एन एल (BSNL) च्या दूरसंचार सेवेचा बोजावरा ; माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व विद्यमान उपसरपंच अविराज परब यांनी आक्रमक मागणी करत दिला उपोषणाचा इशारा.

प्रकाशन: 04 Jul 2023 01:22 PM
वाचन संख्या 218

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब गांवातील बी.एस. एन.एल .ची सेवा सध्या कायमच नादुरुस्त अवस्थेत असते. माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर व विद्यमान उपसरपंच अविराज अविराज परब यांनी ‘जुनी झालेली यंत्रणा बदलून नविन आधुनिक यंत्रणा बसबून टॉवर पूर्ववत करावा’ अशी आक्रमक मागणी केली आहे.

तसेच ‘आता पावसाळा सुरू झाल्यानंतर यांचा त्रास अधिक जाणवत आहे पळसंब गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, रास्त भावाचे धान्य दुकान, ग्रामपंचायत असो किंवा सर्व सामान्य नागरिक सर्वजण या बी एस एन एल च्या गलथान कारभारामुळे त्रस्त आहेत’, आरोप करत पुढच्या ८ दिवसांत बी एस एन एल ने योग्य सेवा न दिल्यास विद्यमान उपसरपंच अविराज परब आणि माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी मालवण कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स