ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पत्रकार निलेश मोरजकर यांचा बांदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पत्रकार निलेश मोरजकर यांचा बांदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार

प्रकाशन: 03 Jul 2023 10:01 PM
वाचन संख्या 33

बांदा /राकेश परब: येथील पत्रकार श्री. निलेश मोरजकर यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरचा ‘द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड’ प्राप्त झाल्याने बांदा ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

श्री मोरजकर हे गेली २१ वर्षे पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना गोवा येथे माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते भास्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडी यांचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देखील जाहीर झाला आहे.

सरपंच श्रीमती नाईक यांनी यावेळी श्री मोरजकर यांच्या कार्याचा गौरव करत आपण बांदा शहराच्या विकासासाठी पत्रकारितेतून योगदान दिले असून भविष्यात देखील समाजाच्या विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे असे आवाहन केले. यावेळी उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, आबा धारगळकर, रुपाली शिरसाट, श्रेया केसरकर, रेश्मा सावंत, कल्पना परब, तनुजा वराडकर, दिपलक्ष्मी सावंत-पटेकर, सामाजिक कार्यकर्ते यशवंत माधव, वरिष्ठ लिपिक संजय सावंत, अमोल तांबुळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली शिरसाट यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स