त्रिंबक मध्ये ग्रामसेवक सुनील प्रभूदेसाई यांचा सन्मान.
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामसेवक सुनील प्रभूदेसाई यांची बदली झाल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ग्रामसेवक म्हणून काम करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. प्रत्येक योजना गरीबातील गरीब माणसा पर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असत असे मनोगत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी सरपंच किशोर त्रिंबककर, उपसरपंच आशिष बागवे, नूतन ग्रामसेविका सौ माधुरी कामतेकर, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर, सुचिता घाडीगांवकर, नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत,
सपना तेली तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)