मालवणच्या श्रीमती पुष्पा अरुण पांगे कालवश ; मुंबईत घेतला अखेरचा श्वास.
मालवणच्या अनमोल हाॅटेलच्या मालक तथा ‘मम्मी ‘ म्हणून होत्या सुपरिचित.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या श्रीमती पुष्पा अरुण पांगे यांचे आज ३ जुलैला मध्यरात्री मुंबईत निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या. मालवण एस.टी.स्टॅन्ड समोरील हाॅटेल अनमोलच्या मालक व ‘मम्मी’ नांवाने त्या सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा रतन पांगे, कन्या संतोषी पांगे, नातवंडे, सुन, जावई असा मोठा परिवार आहे.
अतिशय उत्तम शेफ अशी त्यांची ओळख होती व सामाजिक स्तरावर सर्वाशी मिळून मिसळून रहायच्या स्वभावामुळे त्यांचे मालवणात आदराचे स्थान होते. गेले काही दिवस त्या वार्धक्याने आजारी होत्या आणि आज मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
श्रीमती पुष्पा अरुण पांगे यांच्या निधनाने मालवणच्या सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)