ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
युवकांनी योग्य दिशा निवडल्यास भविष्य उज्ज्वल : प्राचार्य भिकाजीं धुरी
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

युवकांनी योग्य दिशा निवडल्यास भविष्य उज्ज्वल : प्राचार्य भिकाजीं धुरी

प्रकाशन: 25 Jun 2023 02:27 PM
वाचन संख्या 54

बांदा /राकेश परब: युवकांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून मेहनत केल्यास भविष्याची दिशा उज्वल आहे. आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी सुविधा पालकांनी चांगल्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच तरुण पिढीही मेहनती आहे. असे प्रतिपादन शिक्षणतज्ञ प्राचार्य श्री.भिकाजी धुरी यांनी व्यक्त केले. ते मडुरा हायस्कूलच्या विद्यार्थी कौतुक सोहळ्यामध्ये बोलत होते. इयत्ता दहावी मार्च २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या व प्रथम पाच क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी शालेय समिती सदस्य प्रकाश गावडे, श्रीकृष्ण भोगले, माधुरी वालावलकर, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री उल्हास परब, पाडलोस सरपंच सौ. पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुरेश गावडे, माजी उपसरपंच विजय वालावलकर, माजी मुख्याध्यापक श्री दशरथ घाडी, विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

या शाळेतील शिक्षकेतर कर्मचारीही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सामाजिक भावनेने प्रयत्न करतात ही गोष्ट कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन श्री.प्रकाश गावडे यांनी केले.

जीवनात प्रत्येक व्यक्तीला आदर देऊन यशस्वी वाटचाल करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे मार्गदर्शन श्री.उल्हास परब यांनी केले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

सर्वच क्षेत्रांमध्ये मुली आज यशस्वी असताना पहायला मिळतात मुलांची संख्या गुणवंत मध्ये कमी असलेली दिसते याचा विचार मुलांनी करायला हवा व व्यवसाय निवडीसाठी प्रत्येकाने आपली क्षमता लक्षात घेतली पाहिजे व प्रयत्न केले पाहिजेत. असे मार्गदर्शन प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय श्री सुहास वराडकर सर यांनी केले.

ज्या विद्यार्थ्यांना मध्यम गुण मिळालेले आहेत त्यांनी कौशल्यपूर्ण कोर्सची निवड करून आपले भविष्य स्थिर व उज्वल करावे. असे मार्गदर्शन श्री.दशरथ घाडी यांनी केले.

या कौतुक सोहळ्या वेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर इयत्ता दहावीतील कुमारी जान्हवी पंडित व कुमारी मयुरी मधुकर गावडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.

विद्यार्थी कौतुक सोहळ्याचे सूत्रसंचालन सौ.जे. डी.सावंत मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार ग्रंथपाल सौ प्रतिभा चंद्रकांत सावंत यांनी व्यक्त केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स