ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर येथील उद्योजक व समाज कार्यकर्ते सुरेश ऊर्फ बाबू वळंजू कालवश.

चिंदर येथील उद्योजक व समाज कार्यकर्ते सुरेश ऊर्फ बाबू वळंजू कालवश.

प्रकाशन: 17 Jun 2023 08:22 PM
वाचन संख्या 528

शिवसेनेच्या खडतर काळात खंबीर योगदान देणारे शिवसैनिक म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व हरपले ; आचरा विभागावर शोककळा.

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या चिंदर येथील उद्योजक व समाज कार्यकर्ते सुरेश ऊर्फ बाबू वळंजू यांचे काल रात्री ह्रदयविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. आज सकाळी चिंदर नागोचीवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या कै. सुरेश ऊर्फ बाबू वळंजू हे शिवसेनेच्या कठीण काळात वेळोवेळी खंबीरपणे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले शिवसैनिक म्हणून सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. आचरा पंचक्रोशीतील ते एक नावाजलेले काजू व्यापारी होते. कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांना चिंदर गांवातील व परिसरातील संघटना बांधणीसाठी त्यांचे सहकार्य उल्लेखनीय असे असल्याने मालवण तालुक्यातल्या शिवसैनिकांच्या मनात त्यांचे एक आदराचे व वेगळे स्थान होते. त्यांच्या निधनाने आचरा विभागातून शोक व्यक्त होत आहे.

कै.सुरेश वळंजू यांच्या पश्चात भाऊ, भावजया, पुतणे, पुतणी व कुटुंबीय असा मोठा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 442

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स