ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
फोंडा (गोवा) येथे ‘वैश्विक हिंदू राष्ट्र' महोत्सवाला उत्साही वातावरणात प्रारंभ ; देशविदेशांतून, तसेच भारतातील विविध राज्यांतील ३१२ हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

फोंडा (गोवा) येथे ‘वैश्विक हिंदू राष्ट्र' महोत्सवाला उत्साही वातावरणात प्रारंभ ; देशविदेशांतून, तसेच भारतातील विविध राज्यांतील ३१२ हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित.

प्रकाशन: 17 Jun 2023 07:58 AM
वाचन संख्या 886

मालवण | सुयोग पंडित : गोवा राज्यातील फोंडा येथे वैश्विक हिंदू राष्ट्र’ महोत्सवाला काल १६ जूनला उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. सद्यस्थितीत देशात हिंदू ८०% आहेत परंतु जात, पात, प्रांत यात ते विभागले गेले आहेत. १७८०मध्ये या भारतात हिंदूंची संख्या जवळपास १००% होती. महंमद बीन कासीमचे आक्रमण झाले आणि त्याने हिदूंमधील फुटीचा उपयोग करून हिंदू राजा दाहीरचा पराभव केला. हिंदू संघटीत नाहीत, हे आपल्या पराभवाचे प्रमुख कारण असून नौखालीत ज्याप्रमाणे हिंदूंचे हत्याकांड झाले, त्याप्रमाणेच आजही बांगलादेशातही हिंदूंचे शिरकाण होत आहे. पूर्वीची लढाई ही तलवारीच्या बळावर होती, तर आताची लढाई आर्थिक स्तरावर चालू आहे. ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय मुसलमान ताब्यात घेत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक व्यवसायात हिंदूंना जोडून आपली आर्थिक शक्ती वाढवून त्याला उत्तर द्यावे लागेल, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. रणजित सावरकर यांनी उद्घाटन प्रसंगी केले. या अधिवेशनात देशविदेशांतून, तसेच भारतातील विविध राज्यांतील ३१२ हून अधिक हिंदू संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवातून एकत्रित आलेली हिंदु शक्ती हिंदु राष्ट्र निर्माणासाठी जोडली जाईल असे प्रतिपादन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदू जनजागृती समिती यांनी केले. खालिस्तानचा आतंकवाद, श्रीरामनवमी-हनुमानजयंती अशा सणांना दंगलींचे वाढलेले प्रमाण, समलिंगी विवाहाचे समर्थन,‘लिव्ह इन रिलेशनशीप’च्या व्यभिचाराला मान्यता, अश्लीलतेचे वाढते प्रस्थ,अनैतिकतेला संवैधानिक करण्याचे प्रयत्न यांसह अनेक आव्हाने सध्या हिंदूंसमोर आहेत. या सर्व समस्यांवर ‘सेक्युलर’ राज्यव्यवस्थेत कोणतेही उत्तर नसून शाश्वत हिंदु राष्ट्र हेच त्यावर उत्तर आहे. सनातन धर्मदर्शनात हिंदू विश्वाचा, म्हणजेच वैश्विक हिंदु राष्ट्राचा विचार आहे. त्यामुळे हा ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव’ म्हणजे एक प्रकारचे लोकमंथन आहे. या लोकमंथनातून एकत्रित आलेली ही हिंदु शक्ती ही हिंदू राष्ट्र निर्माणाच्या विश्वकल्याणकारी कार्यासाठी जोडली जाणार आहे, असेही प्रतिपादन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या प्रसंगी केले.

या वेळी ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची ‘अनमोल शिकवण’ (खंड १) : साधना प्रत्यक्ष शिकवण्याच्या पद्धती’, या हिंदी आणि मराठी या ग्रंथाचे भागवताचार्य श्री राजीवकृष्णजी महाराज झा, पू. भागिरथी महाराज, पू. रामज्ञानीदास महात्यागी महाराज, अधिवक्ता पू. हरिशंकर जैन, महंत दीपक गोस्वामी यांच्या हस्ते, तर ठाणे (महाराष्ट्र) येथील श्री. दुर्गेश परुळकर यांच्या ‘महाभारतातील अलौलिक चरित्रे : खंड १, निष्काम कर्मयोगी भीष्म’ या ग्रंथाचे श्री. दुर्गेश परुळकर, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, केरलीय क्षेत्र परिपालन समितीचे आचार्य पी.पी. एम्. नायर, प.पू. यतीमाँ चेतनानंद सरस्वती यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. अधिवेशनाचा प्रारंभ शंखनादाने आणि मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर वेदमंत्रांचे पठण झाले. या प्रसंगी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.
या प्रसंगी श्रृंगेरी येथील दक्षिणम्नाय श्री शारदा पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री भारती तीर्थ महाराज यांचे उत्तराधिकारी जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री श्री विधुशेखर भारती महाराज यांनी दिलेला आशीर्वादरूपी संदेशाचा ‘व्हिडिओ’ दाखवण्यात आला. ‘धर्मावरील श्रद्धा वाढवण्यासाठी आणि धर्माचे आचरण होऊन धर्माचे रक्षण होण्यासाठी अशा अधिवेशनांची अतिशय आवश्यकता आहे, असे त्यांनी या संदेशात नमूद केले आहे. याचसमवेत कर्नाटक येथील पेजावर मठाचे श्री विश्वप्रसन्नतीर्थ स्वामीजी यांनी दिलेल्या संदेशाचेही वाचन करण्यात आले.

अधिवेशनाच्या निमित्ताने ट्वीटरवर #HinduRashtra_4_UniversalWelfare या हॅशटॅगद्वारे हिंदू राष्ट्राची चर्चा देशभर चालू असल्याचे दिसून आले. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदू जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे (संपर्क क्रमांक : ९९८७९६६६६६) यांनी याविषयी माध्यमांना विस्तृत माहिती विवेचन प्रसारीत केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स