ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
धामापूर येथील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन ; आमदार वैभव नाईक यांनी केली होती नियुक्ती.

धामापूर येथील शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खासदार विनायक राऊत यांनी केले अभिनंदन ; आमदार वैभव नाईक यांनी केली होती नियुक्ती.

प्रकाशन: 10 Jun 2023 08:03 PM
वाचन संख्या 384

जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत यांची विशेष उपस्थिती.

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या धामापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखाप्रमुख पदी संतोष कदम, युवासेना शाखाप्रमुख प्रणय नाईक आणि शिवसेना महिला उपविभाग प्रमुख पदी जागृती भोळे यांची नेमणूक करण्यात आली. खासदार विनायक राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना सचिव, खा.विनायक राऊत, शिवसेना उपनेते, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज धामापूर गावभेट दौरा केला. यावेळी ही निवड करण्यात आली. दरम्यान गावातील विकास कामांचा आढावा घेऊन ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाळ महाभोज, कमलाकर गावडे, कट्टा ग्रा.प सदस्य बाबू टेंबुलकर, अण्णा गुराम, महिला तालुका प्रमुख श्वेता सावंत, तळगांव सरपंच लता खोत व इतर धामापूर येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स