बागवे हायस्कूल मसुरेचा १०० टक्के निकाल
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर
मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूचा निकाल १०० टक्के लागला. प्रविष्ट २१ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक वैष्णवी संतोष मेस्त्री ९२.४०% , द्वितीय क्रमांक वेदांत राजाराम परब ९२.२०%, तृतीय क्रमांक अभिजीत अनिल मेस्त्री ८९ %, यांनी यश मिळविले. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुंबई कमिटीचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्ष सौ. सरोज परब, मुख्याध्यापीका ए. यू. कोदे , मुंबई व स्थानिक कमिटी सर्व सभासद, शाळा समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)