शिवसेना उप तालुकाप्रमुख रियाज खान यांच्या पाठपुराव्याला यश
बांदा एसटी बसस्थानक आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे आज झाले लोकार्पण
बांदा /राकेश परब: बांदा एस.टी बसस्थानक आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे आज लोकार्पण करण्यात आले. शिवसेना उप तालुकाप्रमुख रियाज खान यांच्या पाठपुराव्याला त्यानिमित्ताने यश आले आहे. त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर एस.टी विभागाने घाईगडबडीत आज स्वच्छतागृहाचे उद्घाटन केले. बांदा एसटी स्टँड आवारात प्रशासनाने नव्याने स्वच्छतागृह उभारले आहे. मात्र, चार महिने उलटले तरीही एसटी प्रशासनाकडून लोकार्पण करण्यात चालढकल करण्यात येत होती. त्यामुळे रियाज खान यांनी दोनवेळा उद्घाटन करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, तरीही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने रियाज खान यांनी एसटी स्टँड आवारातच आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज एसटी प्रशासनाने तातडीने स्वच्छतागृहाचे लोकार्पण उरकून घेतले. यावेळी रियाज खान, मोहसीन खान, राजा खान, महेश शिरोडकर, व्यंकटेश ऊरूमकर, संजय आईर, सदा राणे, वाफोली ग्रा. पं. सदस्य मंथन गवस, सूर्या चव्हाण, गौरांग शेर्लेकर, उमेश शेटकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...