कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा ; आमदार वैभव नाईक यांनी मालवण तहसीलदारांना दिल्या सूचना.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण लगतच्या कोळंब गांवात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली व एकूणच शुद्ध भूजल पातळी कमी झाली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याने आज कोळंब ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केलीे. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी तहसील कार्यालयात उपस्थित राहून कोळंब गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना तहसीलदार श्रीम. झालटे यांना दिल्या. मालवण तहसीलदार पदी श्रीम. झालटे यांची नियुक्ती झाल्याने त्यांना आमदार वैभव नाईक यांनी शुभेच्छा देत मालवण तालुक्यातील इतर प्रश्नांबाबत चर्चा केली.
यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी, नायब तहसीलदार कोकरे, कोळंब सरपंच सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, नितीन नेमळेकर, शहर प्रमुख पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, सन्मेष परब, हेमंत मोंडकर, दादा पाटकर, दिलीप घारे, मांजरेकर,बाबू वाघ यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कोळंब ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)