ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
किल्ले रायगडावरील गाईडना आरोग्य विमा संरक्षण..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

किल्ले रायगडावरील गाईडना आरोग्य विमा संरक्षण..!

प्रकाशन: 31 May 2023 10:48 PM
वाचन संख्या 289

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाचा पुढाकार.

करमाळा जि. सोलापूर येथील मुक्ताई गारमेंटच्या सौजन्याने अभिनव उपक्रम ; शिवराज्याभिषेक दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विमा संरक्षण पत्रं होणार प्रदान.

मुंबई | ब्युरो न्यूज : किल्ले रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणार्या २२ गाईडस् ना आरोग्य विम्याचे संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्ष’ यांच्या वतीने किल्ले रायगडच्या गाईड लोकांना आरोग्य मदतीचा हात दिला आहे.

किल्ले रायगडावरील एकूण २२ गाईड येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज व  छत्रपती संभाजी महाराजांची महती सांगत असतात. अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत सर्व गाईड मंडळी रायगडवर निस्सीम प्रेम करत पराक्रमी इतिहास नित्याने व निष्ठेने सांगत असतात. शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने दरवर्षी ड्रेस कोड प्रदान केला जातो तसेच, मूर्ती पूजनाचे साहित्य दिले आहे.  खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडून रायगड पाच हार २०२१ पासून सुरू आहेत.  त्यातील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण. यामध्ये रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष), रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश अवकिरकर, गणेश झोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर, सुरेश आखाडे, अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप अवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर,  सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर अशा एकूण २२ गाईड लोकांचा समावेश आहे.

या विम्याचे वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजार समावेश आहे. यामध्ये गाईडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.यंदा २ जूनला ३५० व्या शिवराज्याभिषेक मुख्य सोहळ्याच्या दिवशी आरोग्य विमा संरक्षण पत्र सर्व गाईड लोकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिले जाणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 449

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स