काळसे गांवातील मध्यवयीन तरुणाची गळफास लावून आत्महत्या ; कारण अस्पष्ट.
चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या काळसे सुतारवाडी येथील मध्यमवयीन तरुण श्री. वामन रामचंद्र पाटील उर्फ बाबल पाटील ( वय ४५ ) यांनी आज बुधवारी पहाटे आपल्या राहत्या घरातील पडवीच्या वाश्याला टॉवेलच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घरातील व्यक्तींच्या सकाळी ही घटना कळताच त्यांनी पोलीस पाटील विनायक प्रभु यांच्याशी संपर्क केला आणि घटनेची माहिती दिली. त्यानंतर कट्टा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पी. जी. मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आणि मयत वामन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मालवण येथे नेण्यात आला.
कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेला वामन पाटील हा काही दिवसांपुर्वी काळसे येथील आपल्या घरी आले होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून पोलीस पी. जी. मोरे आणि सिद्धेश चिपकर अधिक तपास करत आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)