ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा काॅन्ग्रेसचे  आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप ; राज्यभरातील परिक्षार्थींना फटका बसल्याचे सांगत उद्या आंदोलनाचाही इशारा.

पोलीस भरतीत मोठा घोटाळा झाल्याचा काॅन्ग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांचा आरोप ; राज्यभरातील परिक्षार्थींना फटका बसल्याचे सांगत उद्या आंदोलनाचाही इशारा.

प्रकाशन: 21 May 2023 05:51 AM
वाचन संख्या 276

ब्युरो न्यूज | मुंबई : यंदा मुंबईत झालेल्या पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

या घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती मार्फत सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी फेर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणीही आ. कैलास गोरंटयाल यांनी शनिवारी जालना येथे केली. मुंबई पोलीस भरती मध्ये लेखी परीक्षेत गैरप्रकार झाला असून, आमच्यावर मोठा झाल्याची तक्रार जालना जिल्ह्यातील अनेक परीक्षार्थींनी आ.कैलास गोरंट्याल यांची भेट घेऊन मांडली. अंबड चौफुली येथील शासकीय विश्रामगृहात परीक्षार्थींनी शनिवारी दुपारी आ.गोरंट्याल यांची भेट घेवून झालेल्या अन्यायाचे कथन केले. अन्यायग्रस्त परीक्षार्थीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ.कैलास गोरंट्याल यांनी उपस्थित अन्यायग्रस्त तरुण आणि तरुणींना धीर देत ते म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे जालना जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अन्य जिल्ह्यातील परीक्षार्थीवर देखील अन्याय झाला असेल अशी शंका आहे. लेखी परीक्षेच्यावेळी पोलिस दलातील अधिकाऱ्यांनी गुगल सर्च करून बटण कॅमेऱ्याच्या माध्यमातून परीक्षेचा पेपर बाहेर पाठवून सार्वजनिक करत मायक्रोफोनद्वारे प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. यासाठी परीक्षार्थीकडून प्रत्येकी १० ते १२ लाख रुपयांची लाच घेण्यात आल्याचे अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी सांगितल्याचे आ. गोरंट्याल म्हणाले. या प्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याबरोबरच जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुंबई पोलिस भरतीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

या मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करावी, अन्यायग्रस्तांवरील अन्याय दूर करावा, यासाठी आपण २२ मे रोजी सोमवार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमुद, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नंदा पवार, गणेश चांदोडे, गणेश दाभाडे, संतोष खरात यांच्यासह मुंबई पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेतील काही नाराज परीक्षार्थी उपस्थित हाेते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 88
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 444

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स