विलवडे श्रीदेवी माऊली पंचायतन मंदिराचा कलशारोहण व मूर्तींची पुन:प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात सपन्न
बांदा /राकेश परब: विलवडे गावचे ग्रामदैवत तथा जागृत देवस्थान श्रीदेवी माऊली पंचायतन मंदिराचा कलशारोहण व माऊली पंचायतन देवतांच्या मूर्तींची पुन:प्रतिष्ठापना सोहळा गेले चार दिवस हजारो भाविकांच्या उपस्थितीत आणि ब्रह्म वृद्धांच्या मंत्रघोषात उत्साहात संपन्न झाला.नंतर शेवटी कार्यक्रामाची सांगता झाली. देवता स्थान विधि त्यानंतर मंदिर शिखर कलश प्रतिष्ठा, देवता अधिवास, देवता स्थापन, अग्निस्थापना, ग्रहयाग, वास्तूयाग आदी धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी मंदिरांच्या कलशांची मंदिरा सभोवताली सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिखर कलश मंदिराच्या कळसावर चढवून भक्तिमय वातावरणात आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत कलशारोहण कार्यक्रम झाला.त्यानंतर महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यासाठी विलवडे परिसरातील सर्व गावचे शिमधडे आवर्जून उपस्थित होते. या धार्मिक सोहळ्यात या पुरोहित, तिराहित शिमधड्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कलशारोहण सोहळ्यासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. या धार्मिक सोहळ्यासाठी माहेरवाशीणीही व मुंबई,गोवातील भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शन घेतले. या उत्सवानिमित्त मंदिराचा परिसर गेले चार दिवस हजारो भाविकांनी गजबजून गेला होता. चार दिवस वाडीवार ग्रामस्थांनी केलेले सुयोग्य नियोजन, मंदिरा सभोवताली उभारलेल्या भव्य मंडपामुळे आणि पाणी व्यवस्थेमुळे भाविकांची कोणतीही गैरसोय झाली नाही. दरम्यान पंचकुंडी प्रतिष्ठान सोहळ्यालाही ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात मंदिर परिसर धार्मिक झाले होते. या पंचकुंडी प्रतिष्ठानसाठी खास मंडप उभारण्यात आला होता. तत्पूर्वी यतार्थ होम, तत्व होम आदी धार्मिक कार्यक्रम झाले.
गुरुवारी सकाळी स्थलशुद्धी,देवता पूजन आदी धार्मिक कार्यक्रमानंतर सकाळी श्री माऊली पंचायतन देवतांची मूर्ती स्थापना मोठ्य भक्तीमय वातावरणात सपन्न झाला. चार दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमास शिमदाडयांसह हजारो भाविक,तिराहित,भाचे पिलंगी चे आभार मानले. त्याच बरोबर उत्कृष्ट नियोजनबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. शुक्रवारी धार्मिक कार्यक्रमाची सांगता सत्यनारायण महापुजा व देवीची पुजा,महिलांच्या कुंकुमार्चन ने झाली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)