ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
काजू फळपीक विकास योजनेचा लाभ घ्या!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

काजू फळपीक विकास योजनेचा लाभ घ्या!

प्रकाशन: 14 May 2023 08:44 PM
वाचन संख्या 134

मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांचे आवाहन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: महाराष्ट्रातील काजूच्या सर्वंकष विकासासाठी काजू फळपीक विकास योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे. खासगी क्षेत्रातील रोपवाटिका स्थापन व बळकटीकरणासाठी अनुदान किमान ५० गुंठे ते जास्तीत जास्त १ हेक्टर क्षेत्र अनुदान ७ लाख ५० हजार रुपये, प्लास्टिक आच्छादनासह शेततळे सुविधासाठी अनुदान प्लास्टिक आच्छादन ७५ हजार रु. देण्यात येते. कृषी विभाग जिल्हा परिषदेमार्फत सिंचनासाठी विहीर २ लाख ५० हजार रुपये, फवारणी यंत्रे, पॉवरविडर, -ग्रासकटर १८ हजार रु. प्रतियुनिट, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत जुन्या बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रु. प्रतिहेक्टर ०.२० ते २ हेक्टरपर्यंत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेमार्फत काजू प्रक्रिया उद्योग आधुनिकीकरणासाठी सर्वसाधारण क्षेत्र ४० टक्के, कमाल १० लाख रुपये व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र ३५ टक्के, कमाल १३ लाख ७५ हजार रुपये, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेमार्फत पॅकहाऊस व ड्रॉईंग यार्ड उभारणीसाठी अनुदान सर्वसाधारण क्षेत्र ३५ टक्के, कमाल १० लाख रुपये व डोंगराळ अधिसूचित क्षेत्र ५० टक्के, कमाल २५ लाख रुपये देण्यात येते. शेतकऱ्यांनी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी केले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स