ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
अंमलीपदार्थ विरोधी खात्याचा मुंबईनजिक समुद्रात क्रुज़वरील रेवपार्टीला दणका..!

अंमलीपदार्थ विरोधी खात्याचा मुंबईनजिक समुद्रात क्रुज़वरील रेवपार्टीला दणका..!

प्रकाशन: 03 Oct 2021 05:23 PM
वाचन संख्या 128

बाॅलिवुड कलाकाराच्या मुलासह तेराजणांना चौकशीसाठी घेतले ताब्यात.. .!

मुंबई | ब्यूरो न्यूज : गेल्याचवर्षी साल http://localhost/news/public/uploads/2020 मध्ये ,बाॅलिवुडमधील काही प्रतिथयश अभिनेता व अभिनेत्रींकडे अंमली पदार्थ सेवन आणि त्यांच्या व्यापाराबद्दल संशयाची सुई वळलेली होती. परंतु अपुर्या पुराव्यांमुळे त्यांना निव्वळ चौकशीला सामोरे जावे लागले आणि त्यातून दिलासा मिळाला.
परंतु यावेळी अंमलीपदार्थ विरोधी खात्याने मुंबईतून समुद्र सफरीला निघणार्या ‘कार्डेला द इंप्रेस’ नामक क्रूझवर सुनियोजित पद्धतीने धाड घालून त्यातील रेवपार्टीतील काहीजणांवर कारवाई केली आहे.

साध्या वेशातील नार्कोटीक्स खात्याच्या अधिकार्यांनी त्या क्रुज़वर आधीच आरक्षण करुन जाळे विणलेले होते. 32,000 रुपये प्रवेशमूल्य असलेल्या या क्रूज़वर सहाशे हाय प्रोफाईल लोकांची पार्टी होती. एन.सी.बी.ने त्यातील तेरा पुरुष आणि तीन महिलांना ताब्यात घेतले आहे.
सदर क्रूज़वर अंमलीपदार्थ हे छुप्या पद्धतीने नेले गेले होते.
आजपर्यंत एन.सी.बी.ने केलेल्या धडक कारवाईतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. जवळपास सात तास ही कारवाई व तपासणी क्रुज़वरच सुरु होती. कारवाई दरम्यान कोकेन, हशीश आणि गांजा अशा तीन स्वरुपांत अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीस आणि एन.सी.बी. या दोहोंच्या संयुक्त तपासाने या कारवाईची पुढील प्रक्रिया सुरु आहे.
अटक झालेल्या संशयीतांची वैद्यकीय चाचणी आत्ता सुरु आहे.
संशयीतांच्या फोनमध्ये , जबानीत किंवा वैद्यकीय तपासणीत सदर प्रकरणाबद्दल काहीही तत्थ्य आढळले तर एन.सी.बी.चे अधिकारी सर्वांना कोठडीची मागणी करण्याचीही शक्यता आहे.
एन.सी.बी.चे उच्चाधिकारी श्री. समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील या कारवाईची संपूर्ण सखोल चौकशी करण्याचे आश्वासन एन.सी.बी. व पोलिसांमार्फत देण्यात आले आहे असे एन.सी.बी.चे उच्चाधिकारी श्री.प्रधान यांनी सांगितले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स