मालडी श्री भावई देवी मंदिर वर्धापन दिन १३ मे रोजी!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मौजे धाकटी मालडी येथेश्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार २९ वा वर्धापन दिन सोहळा १३ मे २०२३ रोजी श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी ९ वाजता श्री भावई देवीची षोडशोपचार पुजा व अभिषेक ,सकाळी १० वाजता महाआरती, सकाळी ११वाजता देवीची ओटी भरण्यास प्रारंभ., दुपारी १२.३० वाजता महा प्रसाद, सायंकाळी ७ नंतर स्थानिक ग्रामस्थांचे सुस्वर भजन आणि स्थानिक कलावंताचे करमणुकीचे कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता नाईक दशावतार नाट्य मंडळ, दोडामार्ग यांचा ‘साईदत्त समर्थ लीला’ दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे.उपस्थीतीचे आवाहन मालडी ग्रामस्थां तर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)