ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास -श्रीकांत सावंत.कोकणामध्ये मानवता विकास परिषदच्या वतीने अभ्यास दौरा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास -श्रीकांत सावंत.कोकणामध्ये मानवता विकास परिषदच्या वतीने अभ्यास दौरा

प्रकाशन: 08 May 2023 07:53 PM
वाचन संख्या 35

मसुरे | प्रतिनिधी : खेड्यांचा सर्वांगीण विकास हाच राष्ट्र विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मानवता विकास परिषद या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकताच कोकणामध्ये अभ्यास दौरा केला. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटीगाठी घेऊन एक अहवाल तयार करून लवकरच शासन दरबारी तो मांडण्यात येणार असल्याची माहिती श्रीकांत सावंत यांनी मसुरे येथे बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण व्हावीत आणि या कॉलेजमधून मातृभाषेतून शिक्षण मिळावे तसेच प्रत्येक ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स उपलब्ध व्हावेत आणि या सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या प्रकारे वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी मानवता विकास परिषद च्या वतीने योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार असून कोकणामधील प्रत्येक खेड्यामध्ये सर्व त्या परीने विकासात्मक पावले उचलण्यासाठी मानवता विकास परिषद नेहमी सकारात्मक असून प्रशासन दरबारी तसेच सर्वांच्या सहकार्याने योग्य ते प्रयत्न केले जाणार आहेत. खेड्यांचा विकास करण्याचे ध्येय नजरेसमोर असल्याचे प्रतिपादन मानवता विकास परिषद चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मसुरे येथे यावेळी बोलताना सांगितले.या अभ्यास दौऱ्या दरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील सिविल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वैद्यकीय सुविधांबाबत सविस्तरपणे चर्चा केली तसेच वैद्यकीय सेवा देताना प्रशासनास कोणत्या त्रुटी येत आहेत याबाबतची सुद्धा माहिती करून घेतली. यानंतर सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर प्रकाश गुरव आणि डॉ मनोज जोशी यांच्याशी सुद्धा चर्चा विनिमय केली.

यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन अधिकारी श्री दिलीप पाटील यांची भेट घेऊन विकासात्मक कामांबाबत चर्चा विनिमय करून ग्रामीण भागातील विकास कशा पद्धतीने करता येईल याबाबतची ही सविस्तरपणे चर्चा केली.या अभ्यास दौऱ्या दरम्यान मानवता विकास परिषदचे मालवण मधील कार्यकर्ते श्री ऐश्वर्या मांजरेकर यांनी श्रीकांत सावंत यांचे बांबर्डे येथे स्वागत करून बाबर्डे येथील कोणबॅक या सामाजिक संस्थेस भेट दिली. या ठिकाणी या संस्थेचे श्रीहरी यांनी श्रीकांत सावंत यांचे स्वागत करून सविस्तर चर्चा केली. या नंतर मिलिंद पाटील यांच्या पिंगुळी येथील सह्याद्री बांबू नर्सरी येथे भेट देऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड कशा पद्धतीने करता येईल याबाबतची सविस्तर माहिती मनाली पाटील यांच्याकडून घेतली. त्यानंतर श्रीकांत सावंत यांनी परमपूज्य राहुळ महाराज पींगुळी मंदिरास भेट दिली. याच ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर कृष्णा भाईप, श्री विठ्ठल सावंत, पत्रकार परेश राऊत, विजय केनवडेकर, तसेच उंब्रज येथील मधुसूदन कांदे या सर्वांशी कुक्कुटपालन अंडी व्यापार आधुनिक शेती, ग्रामीण विकास याबाबत सविस्तरपणे चर्चा केली. भगीरथ ग्रामीण विकास प्रतिष्ठानला भेट देत व्यवस्थापक श्री नवीन मालवणकर यांच्याशी ग्रामीण विकासाबद्दल सर्वांगीण चर्चा करून संस्थेच्या कारभाराबद्दल बाबत माहिती जाणून घेतली.युवा उद्योजक संतोष खोत यांच्या ऍग्रो फार्मला भेट दिली या ठिकाणी मिरी लागवड सुपारी लागवड तसेच या ग्रामीण भागातील उद्योगांचा मार्केटिंग याबाबत सुद्धा सविस्तरपणे चर्चा करून माहिती जाणून घेतली. ग्रामीण शेतकरी विकासाबद्दल काय करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात आले. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांशी, सामाजिक संस्थांशी, विविध संघटनांची भेट घेऊन जिल्हा विकासाबाबत माहिती जाणून घेऊन जिल्ह्यात मातृभाषेतून मेडिकल शिक्षण सुरू करणे आणि ग्रामीण भागातील खेड्यांचा विकास करणे याबाबत सर्वांशी चर्चा विनिमय करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक धार्मिक स्थळांना भेटी देऊन पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी काय करता येईल याचे सुद्धा माहिती घेऊन या सर्वांचा एक अहवाल तयार करून शासन दरबारी त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन यावेळी मसुरे येथे बोलताना मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत मानवता विकास परिषदचे ऐश्वर्य मांजरेकर आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स