ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या समीक्षा परब बिनविरोध...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या समीक्षा परब बिनविरोध...!

प्रकाशन: 08 May 2023 07:43 PM
वाचन संख्या 24

नवनिर्वाचित ग्रा. प. सदस्य यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी केला सत्कारप्रतिनिधी-आचरा कणकवली तालुक्यातील साकेडी ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार समीक्षा संतोष परब या बिनविरोध निवडून आल्या. साकेडी ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 3 मध्यें सर्वसाधारण महिला या एका जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. एका जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये समीक्षा संतोष परब व मंगला विजिन जाधव यांचे अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या मंगला विजीन जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ठाकरे गटाच्या समीक्षा संतोष परब या बिनविरोध निवडून आल्या. या निवडीनंतर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी नवनिर्वाचित सदस्य समीक्षा परब यांचे स्वागत करत सत्कार केला. यावेळी त्यांच्यासोबत अरविंद राणे, संदीप राणे, सुरज वर्दम, प्रदीप मेस्त्री, संतोष परब, राजा परब, आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स