कोंडिये येथील पांडुरंग तेली यांचे निधन
संतोष साळसकर | सहसंपादक: कणकवली तालुक्यातील कोंडीये – तेलीवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी पांडुरंग उर्फ बाबी भाऊ तेली ( ६३ ) यांचे शनि. दि. ६ मे रोजी रात्री १०.१५ वाजता अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, दोन भाऊ, भावजय, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अतिशय मनमिळाऊ आणि सुस्वभावी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. कोंडीये – तेलीवाडी येथील माजी सरपंच गणपत उर्फ आप्पा तेली यांचे कनिष्ठ बंधू तर पत्रकार संतोष साळसकर यांचे ते चुलत काका होत. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)