ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पळसंबच्या श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टने 'युवा मित्र मंडळ पळसंबची' प्रशंसा करत मानले आभार..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पळसंबच्या श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टने 'युवा मित्र मंडळ पळसंबची' प्रशंसा करत मानले आभार..!

प्रकाशन: 07 May 2023 08:42 AM
वाचन संख्या 228

आचरा | प्रसाद टोपले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील श्री. आई जयंतीदेवी मंदिरामध्ये चालू असलेल्या कार्यक्रमाचे औचीत्य साधत ४ एप्रिलला श्री .आई जयंतीदेवी मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक असा ९००० रुपये किमतीचे झुंबर ‘युवा मित्रमंडळाच्या’ वतीने भेट देण्यात आले. ते झुंबर फिटींग करण्यासाठी वायरमन श्री .संतोष मुळये यांनी विना मोबदला फिटिंग करून आई जयंती चरणी त्याची सेवा समर्पित केली. त्याबद्दल मंडळाचे पळसंब देवस्थान सर्व मानकरी आणी पळसंब गावाच्या वतीने त्यांची प्रशंसा करुन आभार मानले गेले आहेत.

या नविनच स्थापन झालेल्या युवा मित्रमंडळातील काही सदस्य मुंबईस्थित तर काही पळसंब गांवचे तर काहीजण इतरत्र चरितार्थासाठी गेलेले असूनही युवा वयात त्यांनी दाखवलेली बांधिलकी महत्वाची असल्याचे सांगत युवा मित्र मंडळाच्या सर्व सभासदांना सुख समृद्धी , ऐैश्वर्य लाभो हिच श्री. आई जयंती चरणी प्रार्थना असल्याचे श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट पळसंब यांनी जाहीर सांगितले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स