ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
पाडलोस येथील ग्रुपचे रक्तदान शिबिर संपन्न
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पाडलोस येथील ग्रुपचे रक्तदान शिबिर संपन्न

प्रकाशन: 05 May 2023 02:04 PM
वाचन संख्या 43

बांदा /राकेश परब: पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप हा मनोरंजनाचा ग्रुप नसून समाजशील कार्यकर्त्यांचा ग्रुप आहे. ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होणे ही खूप मोठी बाब आहे. त्यामुळे हा पाडलोस व्हाट्सअप गाव ग्रुप समाजापुढे एक आदर्श निर्माण करत असल्याचे प्रतिपादन, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर यांनी केले.पाडलोस गाव व्हाट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिरात श्री. तेंडुलकर बोलत होते. व्यासपीठावर एसएसपीएमचे डॉ. सुरज वानखेडे, सरपंच सलोनी पेडणेकर, ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे, सदस्य राजू शेटकर उपस्थित होते.प्रत्येक घरातून रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी समोर यायला पाहिजे. रक्ताची कधीही कुठेही गरज लागल्यास सिंधू रक्त प्रतिष्ठान आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही प्रकाश तेंडुलकर यांनी दिली.डॉ. सुरज वानखेडे म्हणाले की, व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक गोष्टी सुरू असतात. परंतु आपल्या माणसांसाठी आपल्याच गावात रक्तदान शिबिर घेणे ही खूप महनीय व उल्लेखनीय कामगिरी आहे. रक्तदान केल्यास शरीरात रक्त बनवण्याची प्रोसेस अधिक जलद बनते. पाडलोस व्हाट्सअप ग्रुपचे रक्तदान कार्य महान असल्याचे उद्गार एसएसपीएम कॉलेज आणि लाईफ टाईम हॉस्पिटलचे डॉ. सुरज वानखेडे यांनी काढले.गावात प्रथमच झालेल्या शिबिरात मीनाक्षी सावंत व काका परब यांनी प्रथम रक्तदान केले. तर प्रमिला करमळकर-ठाकूर यांच्यासह २० दात्यांनी रक्तदान केले तर वाढत्या उष्मामुळे १५ जणांना रक्तदान करता आले नाही. दरम्यान, पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरातून एक उत्साहात निर्माण झाला आहे. येत्या काळात ग्रुपच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबीर आयोजित करू असे सूतोवाच अध्यक्ष विश्राम गावडे यांनी केले. राजू शेटकर यांनी सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स