ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम!मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांना मदत
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भराडी देवी सेवा मंडळाचा अनोखा उपक्रम!मसुरे सुपुत्र रुपेश दूखंडे यांच्या माध्यमातून अनाथ मुलांना मदत

प्रकाशन: 04 May 2023 01:11 PM
वाचन संख्या 31

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भराडी देवी सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र रुपेश दूखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून अनाथ मुलांसाठी काहीतरी चांगले काम करण्याच्या हेतूने जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे आदि वस्तू जमा करून ही सर्व मदत मुंबई ऐरोली येथील रिधी सिद्धी ट्रस्ट येथे देण्यात आली आहे.यासाठी असंख्य दानशुर हातांनी सढळ हस्ते मदत केली. यावेळी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रुपेश दुखंडे म्हणाले, मंडळावर विश्वास ठेवून जी वस्तु किंवा रोख रक्कमेच्या माध्यमातुन मदत केली त्या सर्वाचे आभार आणि यापुढे निराधार लोकांसाठी, अनाथ मुलांसाठी जास्तीत जास्त आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली जाईल. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष श्री कृष्णा चौगुले, सचिव श्री संभाजी कणसे, खजिनदार श्री देवेंद्र चव्हाण, सल्लागार श्री दिनेश बांबळे, श्री अमोल दळवी,महेश साटम, गिरीश चिंदरकर, सतीश दुखंडे, शुभम कणसे, अरविंद घोगळे, ओमकार चव्हाण, संतोष साटम, चेतन परब तसेच मंडळाच्या महिला आणि लहान मुलांची उपस्थित होती. भराडी देवी सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही विविध निराधारांना अनेक अनाथ आश्रमांना अशा प्रकारची मदत केली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स