सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने केले नवनियुक्त शिक्षणाधिकार्यांचे स्वागत...!
मान.मुश्ताक़ शेख़ जिल्ह्याचे नविन शिक्षणाधिकारी…
ओरोस | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणुन मा.मुश्ताक शेख यांनी कार्यभार स्विकारला असून सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे जेष्ठ पदाधिकारी ,सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक ,उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पतसंस्था संचालक तथा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हाअध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी 1 ऑक्टोबर रोजी, नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व सदिच्छा व्यक्त केल्या.
श्री.मुश्ताक शेख हे मुंबई मध्ये कार्यरत होते. त्यांची मुंबई येथुन सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आली होती..
माध्यमिक अध्यापक संघाचे श्री.अजय शिंदे, श्री.विजय मयेकर, श्री . प्रशांत चव्हाण,श्री.उत्तम मळगावकर,श्री.रावण,श्री.गिते, श्री.काका मांजरेकर,श्री.गजानन नानचे,श्री.अनिल राणे,श्री.निलेश पारकर,श्री.टकले हे मान्यवर उपस्थित होते..
शिक्षक , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
शिक्षण विभागातिल रीक्त कर्मचारी यांच्या जागा भरुन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यां मान्य करून न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी चर्चेदरम्यान करण्यात आली.
आगामी काळातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक धोरणांबद्दल थोडक्यात व सकारात्मक चर्चाही करण्यात आली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)