ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
साळीस्ते येथील शिक्षणप्रेमी संतोष ताम्हणकर कालवश.

साळीस्ते येथील शिक्षणप्रेमी संतोष ताम्हणकर कालवश.

प्रकाशन: 14 Apr 2023 02:20 PM
वाचन संख्या 35

संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साळिस्ते ताम्हणकरवाडी येथील संतोष यशवंत ताम्हणकर यांचे अल्पशा आजाराने बुधवारी रात्री निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्यावर साळिस्ते येथील स्मशानभूमीत गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

साळिस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र.१च्या शाळा व्यवस्थापन समितीचे ते अध्यक्ष होते. साळिस्ते शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती म्हणून अध्यक्षपद सलग तीन वेळा त्यांनी भूषविले आहे. शैक्षणिक विकासासाठी नेहमीच त्यांनी आपला हात पुढे केला होता. गेले काही दिवस ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना कणकवली येथे त्यांची प्राणज्योत मालवली. मजुरी करुन गुजराण करत असुनही त्यांचे शिक्षणावर नेहमीच प्रेम दिसून आले. आपल्या शाळेतील मुलांना विविध प्रकारे मदत केली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनानंतर साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, जिल्हा परिषद शाळा, कर्मचारी व ग्रामस्थ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स