ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा येथील अनुभवी पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा 'भास्कर भूषण पुरस्कार' जाहीर.

बांदा येथील अनुभवी पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा 'भास्कर भूषण पुरस्कार' जाहीर.

प्रकाशन: 13 Apr 2023 06:00 AM
वाचन संख्या 410

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अनुभवी पत्रकार निलेश मोरजकर यांना राष्ट्रीय पातळीवरचा ‘भास्कर भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या २८ मे रोजी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते साखळी-गोवा येथील रवींद्र भवन नाट्यगृह येथे य् पुरस्काराचे वितरण होणार आहे. चार दिवसांपूर्वीच
त्यांना ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ, सावंतवाडीचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांच्या दुहेरी पुरस्कार सन्मानाने त्यांचे बांदा शहरात अभिनंदन होत आहे.

श्री. निलेश मोरजकर हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात देखील योगदान आहे. जिल्ह्यातील रक्तदान चळवळीत त्यांचा सहभाग आहे. ते येथील नट वाचनालयचे ते संचालक आहेत. बांदा मराठा समाजाचे माजी अध्यक्ष देखील आहेत.

त्यांना यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्या एकंदर पत्रकारितेमधील योगदानाबद्दल त्यांना ‘भास्कर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स