ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मडुरेत केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मडुरेत केंद्रीयमंत्री ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रिकेट स्पर्धा

प्रकाशन: 05 Apr 2023 10:09 PM
वाचन संख्या 32

बांदा /राकेश परब: केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मडुरा येथील श्री देवी माऊली कला क्रीडा व व्यायाम मंडळाच्या वतीने भव्य ‘माऊली चषक २०२३’ क्रिकेट लीग स्पर्धेचे ६ ते १० एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब व सरचिटणीस विशाल परब यांनी पुरस्कृत केली आहे     सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय २५ हजार रुपये तसेच अनेक वैयक्तिक पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार ६ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता विशाल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच १० एप्रिल रोजी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे. सदर स्पर्धा मडुरा काळा आंबा येथील भूतनाथ मैदानावर होणार आहे. एक गाव एक संघ या संकल्पनेवर सदर स्पर्धा होईल.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स