ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
लायन्स क्लब आणि अंबाजी विद्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.!

लायन्स क्लब आणि अंबाजी विद्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार.!

प्रकाशन: 02 Oct 2021 05:24 PM
वाचन संख्या 87

मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक श्री संतोष लुडबेंचाही विशेष सन्मान…

मालवण | वैभव माणगांवकर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त लायन्स क्लब मालवण आणि अंबाजी विदयालय ,मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन क्षेत्रातील काही मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.त्याच वेळी माजी सैनिक तारकर्लीचे हिंदबाळ केळुस्कर यांचाही सन्मान करण्यात आला.

यावेळी पर्यटन क्षेत्रातील महालक्ष्मी वॉटर स्पोर्ट्स चे मालक. मा. राजनजी कुमठेकर, तसेच वायरी तारकर्ली रोड वरील दादा वेंगुर्लेकर बीच हाऊस, चे मालक दादा वेंगुर्लेकर, आणी देवबाग सिद्धी विनायक हॉटेलचे मालक, मनोज खोबरेकर यांचा शाल, श्रीफळ, गौरव पत्र देऊन लायन्स क्लब मालवण तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच मातृत्व आधार फाउंडेशन या सेवा भावी संस्थेने सामाजिक कामाची जी गगन भरारी घेऊन काम केल्याने, संस्थेचे संस्थापक मा. संतोषजी लुडबे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. शेवटी या सर्वांच्या वतीने प्रशालेच्या पटांगणात वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेवटी उपस्थितांसाठी चहापानाचा कार्यक्रम करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स