ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
चिंदर गावडेवाडी येथे 5 एप्रिल पासून हनुमान जन्मोत्सव सोहळा...!

चिंदर गावडेवाडी येथे 5 एप्रिल पासून हनुमान जन्मोत्सव सोहळा...!

प्रकाशन: 02 Apr 2023 02:32 PM
वाचन संख्या 226

मधुमती गर्वहरण हा नाट्यप्रयोग विशेष आकर्षण

चिंदर/विवेक परब :मालवण तालुक्यातील चिंदर गावडेवाडी येथील हनुमान मंदिरात बुधवार 5 एप्रिल व गुरुवार 6 एप्रिल दोन दिवस हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

बुधवार 5 एप्रिलला सकाळी हनुमंताची विधीवत पूजा, रात्रौ 9.30 वाजता श्री आकारी ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ चिंदर गावठणवाडीचे दिंडी भजन, गुरुवार 6 एप्रिलला सकाळी हनुमंताची विधीवत पूजा, दुपारी 3 वाजता सत्यनारायण महापूजा, रात्रौ 10 वाजता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण “दत्तप्रसाद पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ तिवरे-बेळणे यांचा “मधुमती गर्वहरण” हा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जय हनुमान मित्र मंडळ चिंदर गावडेवाडी यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स