ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
संदेश पत्रांमधुन त्या व्यक्ती भेटल्याचा आनंद ; हास्यसम्राट फेम प्रा. अजीतकुमार कोष्टी यांचे गौरवोदगार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

संदेश पत्रांमधुन त्या व्यक्ती भेटल्याचा आनंद ; हास्यसम्राट फेम प्रा. अजीतकुमार कोष्टी यांचे गौरवोदगार

प्रकाशन: 29 Mar 2023 04:50 PM
वाचन संख्या 25

संतोष साळसकर | शिरगांव: निकेत पावसकर यांच्या अनोख्या छंदाने भारावून गेलो. जागतिक पातळीवर या संदेश पत्रांचे प्रदर्शन भरावे. या पत्रांमधुन अनेक नामवंत व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळाला, असे गौरोदगार झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट फेम प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी काढले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अनोख्या अक्षरघराला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते. प्रा. अजितकुमार कोष्टी यांची झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट या कार्यक्रमातील विनोदी एकपात्री कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहेत. विशेषत: त्यांचा गण्या हे पात्र अनेकठिकाणी विनोदाची बरसात करते. तर झी टॉकीज वाहिनीवरील तडका या कार्यक्रमात हास्याचे फवारे उडवीले आहेत. एका कार्यक्रमानिमीत्त तळेरे येथे आले असता त्यांनी या अक्षरघराला भेट दिली. *विद्यार्थ्यांना आवाहन*यावेळी कोष्टी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी यातून बोध घेउन आपल्या आवडीचा छंद जोपासावा आणि छंदातून आपले नाव जागतिक पातळीवर घेऊन जावे.तसेच, भारतीय हवाई दलातील निवृत्त सार्जंट केदार मातोंडकर यांनीही या अक्षरघराला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी सुर्यकांत तळेकर उपस्थित होते. यावेळी या संग्रहाची प्रशंसा करताना केदार मातोंड़कर म्हणाले की, तुला भेटून एका आगळ्यावेगळया छंदाचा सुगावा लागला. हा छंद जोपासण्यासाठी तुझ्या अथक प्रयत्नांना व ध्यासाला सलाम. यावेळी सतिश मदभावे, सौ. श्रावणी मदभावे, नरहरी पावसकर, सौ. सुनयना पावसकर, सौ. नेत्रा पावसकर उपस्थित होते. यावेळी अक्षरोत्सव परिवाराकडून अजितकुमार कोष्टी आणि केदार मातोंड़कर यांना भारतीय पोस्ट कार्ड़वरील शुभेच्छा पत्र देऊन गौरविण्यात आले. *अक्षरघराला यांनी दिल्या भेटी*तळेरे येथील अनोखी संकल्पना असलेल्या अक्षरघराला विविध क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. सुनिलकुमार लवटे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू पूनम राऊत, आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू जयेश राणे, प्रसिध्द नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर, अभिनेते, दिग्दर्शक संजय खापरे, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, कवी गीतकार प्रसाद कुलकर्णी, साहित्यिक, कथाकथनकार वृंदा कान्बळी, आंतररष्ट्रीय पंच अशोक दाभोलकर, ज्येष्ठ विचारवंत वैजनाथ महाजन, आंतरराष्ट्रीय कामगार नेते विद्याधर राणे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, अभिनेत्री प्राजक्ता वाडये, इस्लामपुरचे डीवायएसपी कृष्णात पिंगळे, चित्रकार राज शिंगे, सुप्रसिध्द चित्रकार प्रकाश कब्रे, पर्यावरण अभ्यासक- लेखक धीरज वाटेकर, माजी राज्यपालांचे सहसचिव प्रा. विनायक दळवी, कणकवली प्रांताधिकारी वौशाली राजमाने यांच्यासारख्या अनेक व्यक्तींनी भेट देऊन अक्षरघराचे कौतुक केले आहे. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स