ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
प्राध्यापक रमाकांत सीताराम गावडे यांना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

प्राध्यापक रमाकांत सीताराम गावडे यांना माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार

प्रकाशन: 28 Mar 2023 09:05 PM
वाचन संख्या 39

प्रदान हरमल-गोवा येथील कार्यक्रमात सन्मानित

बांदा /राकेश परब: गोगटे-वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक रमाकांत सीताराम गावडे यांना हरमल-गोवा येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर यांच्या हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय कायदा मंत्री विरप्पा मोईली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे खासदार अमरसिंग पाटील, अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, बिदरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश मेघन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. गावडे यांना यापूर्वी मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट एनएसएस कार्यक्रम अधिकारी पुरस्कार व महाराष्ट्र शासनाच्या करिअर कट्टा या उपक्रमात उत्कृष्ठ समन्वयक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची शिक्षिका पत्नी सौ. रेश्मा गावडे, भाऊ विजय गावडे उपस्थित होते. प्रा. गावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, म्हैसूरी फेटा व कंठहार देऊन सन्मान करण्यात आला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स