ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भातपिक स्पर्धेत  निरोमचे विश्वास आचरेकर प्रथम!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भातपिक स्पर्धेत निरोमचे विश्वास आचरेकर प्रथम!

प्रकाशन: 25 Mar 2023 08:14 PM
वाचन संख्या 42

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत भात पीक उत्पादन वाढीसाठी घेण्यात आलेल्या खरीप २०२२ स्पर्धेत मालवण तालुक्यातून निरोम येथील विश्वास आचरेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कट्टा येथील सुधीर वराडकर द्वितीय, तर आंबाडोस येथील गोविंद धुरी यांनी तृतीय क्रमांक मिळविल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांनी दिली. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मालवण यांच्यामार्फत कांदळगाव ग्रामपंचायत येथे भातपिकाचे मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी तालुकास्तरीय भात पीक उत्पादने स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कांदळगाव सरपंच रणजित परब, उपसरपंच श्रद्धा बागवे, एग्रीकार्ड शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ. सचिन चोरगे, संदीप धावले, कृषी पर्यवेक्षक धनंजय गावडे, “आत्मा” बीटीएम नीलेश गोसावी, कृषी सहाय्यक पवनकुमार सौंगडे तसेच शेतकरी वर्ग उपस्थित होते. तालुक्यात द्वितीय आलेले वराडकर यांनी सर्व अडचणींवर मात करत श्री पद्धतीने भात लागवड करत अधिक उत्पादन मिळविले.वराडकर हे कट्टा शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा माध्यमिक स्कूलचे शालेय समिती अध्यक्ष आहेत. त्यांनी विद्याथ्र्यांना आधुनिक शेतीचे ज्ञान अवगत होण्यासाठी प्रशालेत कृषी विषयक चर्चासत्रे, प्रदर्शन आयोजित केली. याबद्दल त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स