ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा महीला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महीलांचा सन्मान.....!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

भाजपा महीला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महीलांचा सन्मान.....!

प्रकाशन: 08 Mar 2023 04:55 PM
वाचन संख्या 48

ब्यूरो चिफ-विवेक परब-जागतिक महिला दिनानिमित्त वेंगुर्ले तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान महिला मोर्चाच्यावतीने भाजपा तालुका कार्यालयात करण्यात आला. स्वत:च्या कार्यकर्तुत्वावर समाजात आपले स्थान निर्माण करत समस्त महिला वर्गात एक आदर्श निर्माण केला अशा वेंगुर्ले तालुक्यातील ११ कर्तुत्ववान महिलांचा सन्मान भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सन्मानपत्र, शाल व पुष्प देऊन करण्यात आला. यावेळी महीला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा देताना महिलांनी देशाच्या ७५ वर्षाच्या यशस्वी वाटचालीत सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याचे सांगितले. तसेच देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारी पण आता महिला भगिनी आहे. घर सांभाळणारी महिला ही जसा कुटुंबाचा आधार असते, तसे आज ती देशाचा आधार बनली असल्याचे सांगितले.त्यामुळेच देशाचा अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळण्याची जबाबदारी आज एक महिला निर्मला सितारामण च्या रुपात समर्थ पणे सांभाळत असल्याचे सांगितले. आज झालेल्या कर्तुत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात उद्योजीका व सामाजिक कार्यकर्त्या प्राची प्रल्हाद मणचेकर ( उभादांडा – मानसिश्वर ), शिवणक्लास घेऊन घरचा चरितार्थ चालवणारी रागिणी राजेंद्र परुळेकर ( परुळेकर दत्त मंदिर ), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेकडो प्रशिक्षणार्थींना विवीध प्रकारची कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी प्रणाली गणेश अंधारी ( गाडीअड्डा ), साईमंगल व साईदरबार हाॅलची संचालिका तसेच कॅटरींग व्यवसाईक अक्षता अंबरीश मांजरेकर ( सुंदरभाटले ), वेंगुर्ले तालुका गिरणी मालक संघाच्या अध्यक्षा व महिला उद्योजिका आकांक्षा आनंद परब ( देवुळवाडी ), काजु कारखानदार व उद्योजिका दुर्वा दिपक माडकर ( दाभोलीनाका ), पतीचे निधन झाल्यानंतर स्वत:च्या पायावर उभी राहून स्टाॅल चालवुन मुलांचे पालन पोषण करणारी सायली सखाराम परब ( सातेरी मंदिर ), योगशिक्षिका व मेडिकल योग थेरीपीस्ट साक्षी जयंत बोवलेकर ( हाॅस्पिटलनाका ), स्फूर्ती गृहउद्योगामार्फत विविध प्रकारचे मसाले व पदार्थ बनविणाऱ्या स्मिता सचिन होडावडेकर ( मारुती मंदिर ), कापड दुकानदार व महिलांचे ड्रेसमटेरीयल बनविणाऱ्या स्मिता चंद्रशेखर कोयंडे ( गिरपवाडा ) इत्यादी महिला उद्योजिकांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, महीला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सारिका काळसेकर, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, ता. सरचिटणीस वृंदा गवंडळकर, नगरसेवीका श्रैया मयेकर, नगरसेवीका साक्षी पेडणेकर, नगरसेवीका कृपा मोंडकर, नगरसेवीका पुनम जाधव, अल्पसंख्याक सेलच्या हसिनाबेन मकानदार, रसिका मठकर, मानसी महेश परब, सरीता शिवराम परब, मिनाक्षी धर्माजी माडकर, अंकीता देसाई, परबवाडा ग्रा.पं.सदस्या अरुणा अनिल गवंडे इत्यादी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व प्रार्थना हळदणकर यांनी केले .

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स