ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे (रत्नागिरी ) ६ पुरस्कार जाहीर
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे (रत्नागिरी ) ६ पुरस्कार जाहीर

प्रकाशन: 05 Mar 2023 04:06 PM
वाचन संख्या 77

सिंधुदुर्गातील शिरोडा माऊली कर्णबधीर विद्यालयातील कलाशिक्षक बाळासाहेब पाटील यांचा समावेश

ब्यूरो चिफ/विवेक परब : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती व विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने आपले सन २०२२ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि रुपये ३,००० असे आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी ३ महिलांना सन्मानित करण्यात येत आहे रत्नागिरी येथे सुमारे ४ दशके अग्निहोत्र विषयक कार्य करणाऱ्या आणि कर्मयोगिनी अशी ओळख असलेल्या श्रीमती विद्या मधुकर पटवर्धन आणि व्यसनमुक्त गाव तुरळ (संगमेश्वर) येथील सामजिक कार्यकर्ते श्री. कृष्णा गुणाजी हरेकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गातील शिरोडा (तालुका वेंगुर्ला) येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयातील कलाशिक्षक श्री. बाळासाहेब आबाजी पाटील, मरीन सिंडीकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका व ३ बंदरात थेट जहाजावर जाऊन काम करणाऱ्या पहिल्या महिला अशा रत्नागिरी शहरातील अष्टपैलू सौ. संज्योक्ती संजय सुर्वे, भिंगरोली (तालुका मंडणगड ) सारख्या ग्रामीण भागातून सलग ५ वर्षे रुपये १ कोटीपेक्षा जास्त अल्पबचत गोळा करणाऱ्या सौ. निलम माधव जोशी आणि पाणथळ व पडीक जमिनीत उन्हाळी शेतीचा यशस्वी प्रयोग गेली २१ वर्षे करणारे चिंचघर- प्रभूवाडी ( तालुका खेड) येथील श्री. संजय सखाराम पायरे यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार प्राप्त ६ व्यक्तीपैकी पैकी रत्नागिरी शहराबाहेरील ३सन्मानिताना पुरस्काराची रक्कम बैंक ट्रान्स्फरच्या माध्यमातून दिली जाणार आहे व रत्नागिरी शहरा बाहेरील,४सन्मानितानाची सन्मानपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवली जाणार आहेत. रत्नागिरी शहरातील निवासी श्रीमती विद्या मधुकर पटवर्धन आणि सौ. संज्योक्ती संजय सुर्वे यांचा गौरव, महिलादिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२३ रोजी करण्यात येणार आहे असे बोडस चैरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार अँडव्होकेट सौ.अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे. श्रीमती विद्या मधुकर पटवर्धन राष्ट्रसेविका समितीच्या सुमारे ३४ वर्षे सचिव असलेल्या विद्याताई या सुरुचि महिला उद्योग केंद्राच्या अध्यक्ष होत्या. तसेच रेणुका प्रतिष्ठानच्या विश्वस्त होत्या. घरात सुमारे ४२ वर्षे अग्निहोत्र उपक्रम चालताना त्यांनी जिल्ह्यासाठी प्रमुख साहित्य पुरवठा केंद्र चालवले आहे. अनेक भगिनींना आधार देताना त्या हळदीकुंकू कार्यक्रमातून समाजप्रबोधन करत असतात, यापूर्वी त्यांना रत्नागिरी नगर परिषद, टिळक आळी महिला मंडळ, चित्पावन ब्राह्मणबोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या सन २०२२ च्या संमानितांचा परिचयसंघ स्वामी स्वरूपानंद मंडळ पावस यांचे पुरस्कार मिळाले आहेत. श्री कृष्णा गुणाजी हरेकर- सन १९८० पासून तुरळ ( तालुका संगमेश्वर) हे गाव व्यसनमुक्त करण्यासाठी गावकर बाबुरावजी तळेकर यांनी पुढाकार घेतला होता. गेली ४३ वर्ष हे गाव व्यसनमुक्त आहे. त्याच मार्गावर चालताना श्री कृष्णा गुणाजी हरेकर सुमारे १५ वर्षे नमन व खेळे या लोककलांचे संवर्धन करत आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल राष्ट्रपती प्रशस्तीपत्र मिळाले आहे. त्याच बरोबर ते कुणबी समाज व ओ. बी. सी. समाज तालुका अध्यक्ष आहेत. श्री. बाळासाहेब आबाजी पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा (तालुका वेंगुर्ला) येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जी. डी. आर्ट परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेल्या पूजा धुरी या कर्णबधीर मुलीला घडवण्यात मोलाचा वाटा आहे. एकूण ४ सेवाभावी संस्थांचे सदस्य असून अपंग सेवा हाच स्वभाव ठरवून दिव्यांगांचे विकासासाठी कार्यरत आहेत. यापूर्वी विविध ५ पुरस्काराने सन्मानित आहेत. सौ. संज्योक्ती संजय सुर्वे सुरुवातीला २ वर्षे शिक्षकीपेशात काम केल्यावर १९९२ मध्ये युनायटेड समुहात पदार्पण केले. मरिनर कॅप्टन दिलीप भाटकर यांचे मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, जयगड व विजयदुर्ग या ३ बंदरात थेट जहाजावर जाऊन काम केले. २००१ मध्ये मरीन सिंडीकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका म्हणून कार्य सुरु केले. कोकणशिल्प या कालिकाच्या सहयोगी संपादक, ज्ञानमित्र ट्रस्टच्या सचिव, नंदाई एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त, तसेच सूत्रसंचालिका, व्याख्यात्या आणि मनुष्यबळ विकासासाठी कार्यरत आहेत. सौ. निलम माधव जोशी- मंडणगड तालुक्यातील भिंगरोली सारख्या ११०० लोकवस्तीच्या गावातून गेली २५ वर्षे अल्पबचत आणि आवर्ती ठेव यांचे कार्य करत आहेत. प्रथम वार्षिक १ लाख इतकेच संकलन करत होत्या २००३ नंतर स्वेच्छानिवृत्तीनंतर जोमाने काम करताना गेली सलग ५ वर्षे १ कोटी रुपयांची अल्पबचत व आवतठेव जमा केली आहे. पती माधव जोशी, टपाल खात्यातील कर्मचारी व शासकीय नोकर यांचे सोबत ग्रामीण जनतेचे चांगले सहकार्य लाभत आहे. श्री. संजय सखाराम पायरे. चिंचघर प्रभूवाडी (तालुका खेड) येथील वडिलोपार्जित जमिनीत पुराचे पाणी भरून (A) जमीन पाणथळ झाल्याने २१ वर्षांपूर्वी उन्हाळी शेतीचा प्रयोग सुरु केला त्या नंतर इतरांची जमीन भाडेतत्वावर घेऊन जादा क्षेत्र उन्हाळी लागवडीसाठी वापरले. बँक ऑफ महाराष्ट्र कडील पीक कर्ज आणि कृषी अधिकारी यांचे सहकार्याने शिराळी, कारली, वांगी, काकडी, गावर, भेंडी, काळा भोपळा व कलिंगड याची शेती करून लाखोचे उत्पन्न मिळवले. तरुणांना शेतीकडे वळवण्याचे काम करत आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स