ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
दलित वस्ती सुधार योजनेतला कोट्यावधींचा निधी परत जाणार…?
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दलित वस्ती सुधार योजनेतला कोट्यावधींचा निधी परत जाणार…?

प्रकाशन: 05 Mar 2023 10:26 PM
वाचन संख्या 85

माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती अंकुश जाधव आक्रमक

सहसंपादक / नवलराज काळे- जि. प. च्या समाज कल्याण विभागाला दरवर्षी दलित वस्ती सुधार योजनेतून कोट्यावधी निधी प्राप्त होत आहे. आपण समाजकल्याण सभापती म्हणून यासाठी खूप मोठा संघर्ष केला, त्यामुळे निधित वाढ करून मिळत आहे. परंतु हा निधी परत जाणार असल्याचे वृत्त आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. याला पूर्ण पणे जि. प. प्रशासन जबाबदार असून, निधी मार्च अखेर पर्यत खर्च न करता शासनाकडे परत गेल्यास जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासक यांच्यावर ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी तक्रार करू अशी संतप्त प्रतिक्रिया माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी दिली आहे.जि. प. समाजकल्याण विभाग यांना दरवर्षी अनुसूचित जाती, बौद्ध धर्माचा विकास या योजनेतून पूर्वीची दलित वस्ती सुधार योजना यातून कोट्यावधी निधी निकास कामे करण्यासाठी मिळत असतो. मात्र, यावर्षी हा निधी परत जाणार असल्याचे समजत असल्याचे सांगत, अंकुश जाधव यांनी संताप व्यक्त करणारी तीव्र प्रतिक्रिया दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स