ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने मुणगे येथे साडी वाटप!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने मुणगे येथे साडी वाटप!

प्रकाशन: 05 Mar 2023 01:34 PM
वाचन संख्या 46

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर मुणगे आडबंदर,आपई, कारिवणे वाघोळी नगर येथे यशस्विनी प्रतिष्ठान आणि संघर्ष मित्र मंडळ आडबंदरचे सुपुत्र श्री.आनंद मालाडकर यांच्या सौजन्याने प्रभाग क्रमांक एक सदस्य सौ.रविना मालाडकर, सौ.अंजली सावंत, श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ सायली बागवे यांच्या अथक प्रयत्नाने महिला बचत गटाच्या सदस्या, एकता ग्राम संघाचे पदाधिकारी, आशा सेविका,बचत गटाच्या सीआरपी यांना साडी वाटप करण्यात आले. सरपंच सौ. साक्षी गुरव, पोलीस पाटील सौ, साक्षी सावंत, एकता ग्राम संघाच्या अध्यक्ष सौ.सविता रूपे, सचिव सौ.आरती सावंत, कोषाध्यक्ष सौ. हर्षदा मुणगेकर लिपिका अनुजा कारेकर, माजी सरपंच सायली बागवे, सदाफुली बचत गटाचा अध्यक्षा सौ.देवयानी राणे,उपाध्यक्षा सौ.शोभा पाडावे माऊली बचत गटांच्या सदस्या आणि आपई वाडीतील सर्व बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.प्रत्येक वेळी नवीन नवीन सामाजिक उपक्रम राबवत प्रभागसेविका सौ. रवीना मालाडकर, सौ.अंजली सावंत,श्री.धर्माजी आडकर, माजी सरपंच सौ. सायली बागवे यांनी सामाजिक कार्याची बांधीलकी कायम जपून ठेवली आहे असे मान्यवरांनी सांगितले. दुर्गा परब यांनी सूत्रसंचालन करत यशस्विनी प्रतिष्ठान अध्यक्ष श्री. आनंद मालाडकर आणि कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स