साईच्या पालखीचे बाद्यांत भक्तीपुर्ण वातावरणात स्वागत
बांदा /राकेश परब : बांदा शहरात गोवा राज्यातुन आलेल्या गोवा ते कुडाळ या साई पालखी पदयात्रेत श्री साईबाबा भक्त सेवा मडंळाच्या वतीने भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. कुडाळ कवीलकाटे येथील साईमंदीरा पर्यत हि पदयात्रा जाणार आहे. या पदयात्रेत सुमारे १०० साईभक्त सहभागी झाले आहेत. या मध्ये महीला वर्गाचा सहभाग होता.बांदा येथील ऐतीहासीक साईमठात या पदयात्रेत आगमन होताच साईभक्ताचे स्वागत करून साईची आरती करण्यात आली. यावेळी श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाचे अध्यक्षीय राकेश केसरकर, उपाध्यक्ष रविंद्र मालवणकर, सौ दर्शना केसरकर , जेष्ठ सल्लागार ज्ञानेश्वर केसरकर, गिरी महाजन, शैलेश केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, साईराज सांळगावकर,राजेश कारेकर,बंड्या हरमलकर, राज हरमलकर,व राजेद्र प्रभु उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)