वाफोली पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ न केल्यास सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांचे बेमुदत आंदोलन
बांदा /राकेश परब : बांदा आंबोली मार्गावरील वाफोली धरणा नजीक पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ सुरु करावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडे वाफोली गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी केली आहे.संबधित ठेकेदारांकडून आठ दिवसांत काम सुरु न केल्यास ८ मार्च रोजी वाफोली धरण जवळील पुलावर बसून बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा आईर यांनी दिला आहे. बांदा आंबोली मार्गावर वाफोली धरणानजीक पुलाचे काम नाबार्ड योजनेअंतर्गत सुमारे ७५ लाख खर्च करुन काम गेल्या मार्च अखरीस पुर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूने मजबुतीकरण व डांबरीकरण रस्ता अपूर्ण आहे. रस्ता पुर्णत: पणे खड्डेमय झालेला आहे. वाहनचालकास मोठी कसरत करावी लागत आहे.गतवर्षी पावसाळ्यात चिखलाचे सामाज्र पसरल्याने अपघात झाले होते. सद्या फेब्रुवारी अखरीस रस्ता पुर्णत: खड्डेमय व धुळीमुळे वाहन धारकांना वाहने चालविताना नाहक त्रास होत आहे. अशा परिस्थीतीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. याला संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग पुर्णत जबाबदार आहे. असे आईर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोल्हापुर पुणे गोवा येथे जाणारे पर्यटक जवळचा मार्ग असल्याने ये जा करत असल्याने मार्गावर मोठ्या संख्येने गाड्यांची रेलचेल असते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)