ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रोटरी क्लब च्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे क्षयरोग 'निक्षयमित्र' या उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रोटरी क्लब च्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे क्षयरोग 'निक्षयमित्र' या उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप

प्रकाशन: 24 Feb 2023 02:34 PM
वाचन संख्या 40

बांदा : राकेश परब रोटरी क्लब च्या ११८ व्या वर्धापन दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ बांदा व रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे क्षयरोग ‘निक्षयमित्र’ या उपक्रमा अंतर्गत लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी क्लब ऑफ बांदा चे अध्यक्ष रो. मंदार कल्याणकर, उपाध्यक्ष रो. प्रमोद कामत, सचिव रो. फिरोज खान, खजिनदार रो बाबा काणेकर, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा चे अध्यक्ष रो.अक्षय मयेकर, उपाध्यक्ष रो संकेत वेंगुर्लेकर, सहसचिव रो मिताली सावंत
तसेच रोटरी क्लब बांदा चे सदस्य रो आबा धारगळकर, रो सुधीर शिरसाट रो.आपा चिंदरकर, रो. सुदन केसरकर, रो हनुमंत शिरोडकर, रो. डॉ कोकाटे, रो सीताराम गावडे, रो संदीप देसाई, रो शितल राऊळ,
यावेळी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ जे एल पाटील उपस्थित होते. रोटरी अध्यक्ष रो मंदार यांनी सर्व क्षयरोग लाभार्थ्यांना नोव्हेंबर २०२२ पासून प्रत्येक महिन्याचे धान्य पुरवले जाते व यापुढेही प्रत्येक महिन्यात पुरवले जाईल असे प्रतिपादन केले. तसेच रोटरॅक्ट क्लब रोटरी क्लब च्या खांद्याला खांदा लावून लोकसेवेत काम करेल असे मत रोटरॅक्ट अध्यक्ष रो अक्षय मयेकर यांनी व्यक्त केले.आभार प्रदर्शन सुधीर शिरसाट यांनी केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स